बेळगाव प्रश्नी महाजन अहवाल देऊन सुद्धा केंद्र सरकारने गेली 50 वर्ष यावर कोणताच ठोस निर्णय घेतला नसून महाराष्ट्राने अजूनही बेळगावचा विचार कमी केला नाही त्यामुळे या प्रश्नी कर्नाटकातील सर्वच राजकीय पक्षांनी पक्षभेद विसरून एकत्र यावं अस आवाहन माजी मंत्री आमदार बसवराज होरट्टी यांनी मांडलं आहे.विधान परिषदेत सहभागी झाल्यावर उत्तर कर्नाटकच्या विकासावर चर्चा करताना ते बोलत होते
बेळगावात मराठी फलक का आहेत?कर्नाटकच अन्न पाणी सेवन करून मराठी भाषिक कर्नाटक विरोधी काळा दिन कसा काय पाळतात?असा देखील मराठी द्वेष त्यांनी सभागृहात मांडला. काळ्या दिनाच्या सायकल फेरीत सहभागी झालेल्या महापौरावर राज्य सरकार गप्प का?राज्य सरकार विरोधी घोषणा देणाऱ्या समिती आमदारांना किती धैर्य आहे?का समितीच्या मेळाव्यास परवानगी दिली जाते असे प्रश्न मराठी कावीळ दाखविली.सुप्रीम कोर्टातील खटल्या साठी कर्नाटकाने साक्षी पुरावे गोळा करावेत सर्वच राजकीय पक्षांनी एकत्रित यावे अशो देखील भूमिका मांडली
.