काळ्यादिनाच्या फेरीत सहभागी मराठी महापौर आणि नगरसेवकांवर कारवाई करा ही मागणी जोर धरत आहे. या संदर्भात एक विधेयक संमत करण्याची मागणी वाढली आहे. काळ्या दिनाला महापौर बाईंना जायचे नव्हते मात्र माजी महापौर सरिता पाटील यांच्या सांगण्यावरून त्या गेल्या आहेत यामुळे सर्वप्रथम सरिता पाटील यांच्यावर कठोर कारवाई करा, अशी मागणी करून सरिता पाटील यांना टार्गेट करण्यात आले आहे.
काही नगरसेवक नगरविकास मंत्री रोशन बेग आणि पालकमंत्री रमेश जारकीहोळी यांची भेट घेतली होती. त्यावेळी ही मागणी करण्यात आली आहे. यावेळी एक मराठी नगरसेवक आणि नगरसेवक पती देखील उपस्थित होता अशी माहिती मिळाली आहे.सरिता पाटील या किरण ठाकूर आणि मध्यवर्ती समितीच्या जेष्ठ नेत्यांच्या मार्गदर्शना नुसार काम करतात, स्वतः ठाकूर आणि सरिता मूक फेरीत हजर होत्या, त्यांनीच महापौर यांनाही भरीस भर घालून फेरीस नेले होते असे एक कन्नड नगरसेवकाने रोशन बेग यांना सांगितले आहे.
यापुढील काळात काळ्या दिनास परवानगीच देण्यात येऊ नये, तसे समिती च्या नावाखाली कर्नाटक विरोधी कृत्ये करणाऱ्या सरिता पाटील सारख्या मंडळी आणि त्यांच्या नेत्यांवर कारवाई करावी. एक स्वतंत्र विधेयकच करावे आशा मागण्या करण्यात आल्याचे समजले आहे.
अधिवेशनात हे विधेयक गुरुवारी किंवा शुक्रवारी मांडले जाईल अशी शक्यता आहे.