भाजप महानगराच्या वतीने बेळगाव महानगरच्या वतीनं परिवर्तन रॅली शहापूरमध्ये आयोजित करण्यात आली आहे , मात्र व्यासपिठाच्या मागे लावण्यात येणाऱ्या फ्लकावर फोटो लावण्या वरून अंतर्गत भाजपच्या गोटात धुसफूस वाढली आहे.
सोमवारी सायंकाळी शहापूर येथे भाजप प्रदेशाध्यक्ष बी एस येडीयुरप्पा आणि छत्तीसगडचे मुख्यमंत्री रमनसिंह यांच्या उपस्थितीत परिवर्तन रॅली व सभेचे आयोजन करण्यात आले आहे बेळगाव उत्तर आणि दक्षिण भागातील भाजप कार्यकर्ते हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी राबत आहेत.
आता पर्यंत बेळगाव जिल्ह्यात झालेल्या परिवर्तन यात्रेतिल व्यासपिठांवर आगामी विधान सभेतील उमेदवारी नक्की झालेल्यानी आपापले फोटो प्रदेशाध्यक्ष आणि राष्ट्रीय नेत्यांसोबत लावले होते. गोकाक अरभावी, बेळगाव ग्रामीण कित्तूर, सौन्दत्ती बैलहोंगल मतदार संघातील भावी उमेदवारांनी फोटो लावलेले होते. मात्र बेळगाव महानगराच्या या परिवर्तन यात्रेत काहींनी आपले फोटो लावण्याचा प्रयत्न केला आहे मात्र वरिष्ठ नेत्यांनी हस्तक्षेप करून कोणीही व्यासपिठा वरील फलकावर फोटो लावू नयेत असे बजावलेत आहेत.
छत्तीसगडाच्या मुख्यमंत्र्यांना झेड प्लस सुरक्षा असल्याने केवळ 25 जणच व्यासपिठा उपस्थित राहणार आहेत , अनेक इच्छुकांनी व्यासपिठावर आपली खुर्ची पक्का करण्याचा प्रयत्न केला होता.
मात्र आता अनेकांचा हिरमोड झाला आहे