भगवे वादळयुवक मंडळ आयोजित शिव चरित्र आयोजित प्रश्न मंजुषा स्पर्धाचं बक्षीस वितरण कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला . शिवाजी महाराजांच्या जीव चरित्रावर आधारित प्राथमिक आणि माध्यमिक शाळांच्या विध्यार्थ्यासाठी प्रश्न मंजुषा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते यात १८०० विध्यार्थ्यानी सहभाग नोंदवला होता . या स्पर्धेचे बक्षीस वितरण करण्यात आले
यावेळी दोन्ही विभागात ५ आणि १५ उत्तेजनार्थ बक्षिस देण्यात आली . भाजप नेते अनिल बेनके .दत्ता मोरे .विजय जाधव सह अन्य यावेळी उपस्थित होते . प्राथमिक विभागात वनिता विद्यालयाची आशा विशवनाथ पाटील ,मन्नूर प्राथमिक शाळेचा गणेश कडोलकर ,व्ही एम शानभाग शाळेचा साहिल पाटील बालिका आदर्श शाळेची राधिका लाड कंग्राळी बी के शाळेचा अविनाश खोत तर माध्यमिक विभागात नानावाडी संजय गांधी विध्यालयचा करण पाटील,महिला विद्यालयाची तृप्ती पाटील ,महिला विध्यालयची संजना पाटील, महिला विध्यालयची मनाली पाटील मन्नूर हाय स्कुल ची श्रेया पाटील यांचे पहिले पाच क्रमांक आहेत .
Trending Now