आगामी विधानसभा निवडणुकीत ऑल इंडिया मजलिस ए इतेहालूद मुसलमीन ( एम आय एम ) बेळगावातून देखील निवडणूक लढवणार आहे . एम आय एम चे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांनी कर्नाटकातून १०० हुन अधिक जागांवर निवडणूक लढविण्याचे स्पष्ट संकेत दिले असून बेळगावातून देखील एम आय एम चा उमेदवार रिंगणात असेल असं स्पष्ट केलं आहे.
गेल्या काही निवडणुकात एम आय एम ला निवडणुकात यश मिळालं नसलं तरी मुस्लिम बहुल असलेल्या बंगळुरू गुलबर्गा विजापूर मंगळुरु आहे बेळगावातून एम आय एम दोन हात करणार आहे . बेळगाव उत्तर मतदार संघातील मुस्लिम मतदारांची संख्या पाहता बेळगाव उत्तर मधून एक तगडा उमेदवार आल्यास काँग्रेस ची डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे .बेळगाव उत्तरेच्या विध्यमान आमदारा विरोधातील असलेले एक माजी उर्दू नगरसेवक देखील प्रयत्नशील असल्याची देखील माहिती मिळत आहे