मंत्री डॉ मोहन कुमारी यांचे इंग्रजीतील पुस्तक प्रेरणादायी
महिलेच्या सबली करणाचा विषय सार्वत्रिक स्वरूपात गांभीर्याने चर्चेत असतो. केंद्र शासन आणि विविध राज्यांकडून महिलांच्या सबलीकरणाचा विविध योजना राबविल्या जातात. समाजात महिलांना पुरुषांच्या बरोबरीने स्थान मिळत असल्याने सर्वच क्षेत्रात महिला आत्मविश्वासाने आपली कामगिरी दखवत आहेत. कर्नाटकात अशा महिलांचा शोध घेऊन त्यांच्या कार्यकचा लेख जोखा अत्यन्त नेमक्या शब्दात मांडण्याचा प्रयत्न कर्नाटक सरकारचे साखर व लघु उद्योग मंत्री डॉ.मोहन कुमारी यांनी यशस्वीरित्या केला आहे.
इंग्रजी भाषेतील या पुस्तकात 104 महिलांच्या कर्तृत्वाचा आलेख मांडला आहे.पुस्तकाच्या माध्यमातून राज्यतीलच नव्हे तर देशातील महिलांना समोर आदर्श निर्माण करण्याचा या पुस्तकाचा हेतू आहे. मंत्रीपदावर असताना सुद्धा अत्यन्त जाणीवपूर्वक आणि महिलांसाठी हे पुस्तक प्रेरणा देणारा स्रोत म्हणता येईल. या पुस्तकाला विजापूर येथील मठाचे स्वामी सिद्धेश्वर यांनी दिलेली प्रस्तावना ही तेवढ्याच मोलाची आहे.
महिलांना आरक्षण मुळे सर्वच क्षेत्र खुली झाली आहेत. निवडणुकीत सुद्धा महिला आता मोठ्या संख्येने येत असून आपल्या कर्तृत्वातून त्यांना चांगले काम करण्याचा प्रयत्न आहे. पुरुषांची मक्तेदारी म्हटली जात असली तरी गेल्या काही वर्षां पासून महिलासुद्धा पूर्ण क्षमतेने पुरुषांच्या बरोबरीने तर काही पुरुषांपेक्षा ही अधिक कार्यक्षमरित्या कार्यरत असल्याचे चित्र पहायला मिळते.सर्वच महिलाना प्रेरणा मिळावी महिलांच्या सबलीकरणांची ही गोष्ट आवश्यक आहे. याचा विचार करून डॉ.मोहन कुमारी या पुस्तक लेखनाचा प्रपंच केला. यासाठी मंत्री मंडळाची जबाबदारी सांभाळत राज्यभरातील 104 माहिलांची निवड केली. राज्याच्या विविध भागात आणि विविध क्षेत्रात उत्तम कामगिरी करणाऱ्या या महिलांशी थेट संवाद साधत त्यांचे कार्य समजून घेतले आणि या कार्याचा आलेख या पुस्तकात उतरविण्याचा यशस्वी प्रयत्न केला आहे. कला,संगीत,उद्योग,विज्ञान, चित्रपट, सामाजिक अशा क्षेत्रात विशेष कामगिरी करण्याऱ्या महिलांचा समावेश या पुस्तकात आहे. 500 पानांचे हे पुस्तक इंग्रजीत आहे. कारण प्रादेशिक भाषेत पुस्तक केले तर त्याला मर्यादा येऊ शकतात. इंग्रजी भाषेच्या माध्यमातून देशविदेशात या महिलांचे कार्य पोहचावे यासाठीच त्यांनी इंग्रजी भाषेतून या पुस्तकाची उत्तम निर्मिती केलीं आहे. या पुस्तकात डॉ.सुधा मूर्ती, डॉ.विजयालक्ष्मी बाळेकुंदरी, श्रीमती चिंदोडीलीला, बेळगावच्या उद्योजक विद्या मुरकुंबी, विजयालक्ष्मी बिद्री, माजी मंत्री ललिता नायक, सरस्वती जॉयस, साल्मारादा तिम्मक्का , अड.प्रमिला नेसर्गी ,लीला देवीप्रसाद,राहाना बेगम ,के नागरत्नम, नागमनी राव, गाणं सम्राज्ञी गंगुबाई हनगल, माते महादेवी , शामला भावे ,अश्विनी नाचप्पा, गौरी लंकेश, माजी मंत्री सरोजिनी महेशी, बी सरोजादेवी, याना या पुस्तकात स्थान दिले आहे.
डॉ. मोहन कुमारी यांनी अतिपरिश्रमपूर्वक या पुस्तक लेखनाचे काम केले आहे. पुस्तकाची मांडणी आणि एकूणच हे पुस्तक ववचकांसाठी खास नजराणा ठरणार आहेच. शिवाय महिलावर्गासाठी एक प्रकारे प्रेरणा देणारी ही आहे.
प्रशांत बर्डे
बेळगाव