पश्चिम भागात राज्यस्तरीय खो खो स्पर्धेस ग्रामीण काँग्रेसच्या महिला नेत्यांला कार्यक्रमाचे अध्यक्ष केल्याने नाराज ग्रामस्थानी त्या कार्यक्रमाकडे पाठ फिरवली होती त्यामुळे या कार्यक्रमाचा फज्जा उडाला आहे.
हिंडलगा सुळगा येथे मराठी प्रेमी युवकांनी राज्य स्तरीय खो खो स्पर्धेचं आयोजन केलं होत तालुक्यात साड्या वाटून मत मिळवण्याचा प्रयत्न करणाऱ्या महिलेने स्पर्धेसाठी मोठी देणगी दिली होती गावातील जुनी जाणती मंडळी सोडून काही जणांच्या हट्टापायी महिलेला कार्यक्रमाचं अध्यक्षपद दिल्याने नाराज स्वाभिमानी सुळग्याच्या जनतेने कार्यक्रमाकडे पाठ फिरवली होती.खो खो सारख्या खेळात राजकारणाचा वास आल्याने या कार्यक्रमाचा फज्जा उडाला होता या भागातल्या तालुका पंचायत सदस्यांन महिलेच्या कार्यक्रमाकडे जाऊ नका म्हणून लोकांना परावृत्त केलं होतं त्यामुळं सुज्ञ जनतेने या कार्यक्रमाकडे पाठ फिरवली होती
सुळगा ग्राम पंचायत अध्यक्षाच ‘मॅडम प्रेम‘
तालुक्यात सर्वत्र पैश्याची खैरात होऊन मराठी भाषिकांना आमिषे मिळत असताना या कार्यक्रमात सुळगा ग्राम पंचायतीच्या अध्यक्षांच मॅडम प्रेम पुन्हा एकदा समोर आलं आहे.समितीच्या तिकिटावर निवडून येऊन राष्ट्रीय पक्षाच्या नेत्यांचे गोडवे गाणारे असल्यामूळेच तालुक्यात मराठीची अधोगती होत आहे.’हेकेखोर नेत्यांने’ अश्याना लगाम घालावा अशी मागणी केली जात आहे.