आरोग्य मंत्री रमेश कुमार यांच्या आरोग्यात बिगाड झाल्याने त्यांना उपचारासाठी बंगळुरू येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. शुक्रवारी रात्री ते सुवर्ण विधान सौध मधील अधिवेशनाच कामकाज आटोपून बंगळुरू गेले असता रविवारी अचानक उलटी जुलाब झाल्याने त्यांची तब्येत ढासळली आहे.
गेले चार दिवस आरोग्य मंत्री रमेश कुमार बेळगावात होते डॉक्टरांचा संप आणि सरकारच्या खाजगी रुग्णालय दुरुस्ती विधेयका वरून ते अधिवेशनाच्या कामकाजात एकदम सक्रिय होते आणि चर्चेतही होते. त्यांचं मूळ गाव कोलार हे असून शुक्रवारी रात्रीच गावाकडे रवाना झाले होते.बेळगावच्याअधिवेशनात मंत्री अधिकारी आमदार आणि पत्रकारांना देण्यात येणाऱ्या जेवणाच्या क्वालिटी वरून सर्वत्र टीका होत असताना आरोग्य मंत्र्यांना देखील बेळगावातील अधिवेशनातील जेवण मानवल नसल्यानेच त्यांची तब्येत बिघडली असल्याचं बोललं जातं आहे.
पुढचा आठवडा अधिवेशनाच्या कामकाजाच्या दृष्टिकोनातून आरोग्य मंत्री यांच महत्वपूर्ण योगदान राहणार आहे डाक्टरांच्या प्रतिनिधी मंडळाशी चर्चा करून विधेयक विधान सभेत मांडून मंजूर करून घेणार आहेत. फूड पॉइजनिंग मुळे त्यांची तब्येत बिघडल्याने ते सोमवारी अधिवेशन कामकाजात सहभागी होतात की नाही याबाबत साशंकता आहे. मेडिकल विधेयक मंगळवार किंवा बुधवारी मांडलं जाणार असल्याने मंत्री रमेश कुमार मंगळवारी सकाळी म्हणजे दोन दिवस विश्रांती घेऊन बेळगावात येतील अशी देखील माहिती मिळत आहे.बेळगावातील पहिल्या दोन अधिवेशनातील जेवणाचा दर्जा वगळता जिल्हा प्रशासनाने दिलेल्या जेवणाच्या दर्जा बद्दल टीका होताना दिसत आहे.