सांबरा येथे तीन जनावरांचा संशयास्पद रित्या मृत्यू झाल्याची घटना सांबरा येथे शनिवारी सकाळी उघडकीस आली आहे मोहन हरजी यांच्या दोन म्हशी तर गजानन जत्राटी यांच्या गायीचा यात समावेश असून जवळपास दीड लाखांचं नुकसान झालं आहे.
सांबरा मेन रोड वर बसवाण तलावाजवळ मोहंन हरजी यांच घर आहे सकाळी गोठ्यात गेले असता तिन्ही जनावरे मृतावस्थेत पडलेली दिसली लागलीच मोहन यांनी गावकरी पोलिसांना याची कल्पना दिली.मारिहाळ पोलीस निरीक्षक ज्योतिर्लिंग होंनकट्टी यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.
घातपात झाल्याचा संशय
मृत जनावरांच्या गोठ्यात गवताच्या ठिकाणी गोदणीत कीटकनाशक पदार्थाचा दुर्गंधीचा वास होता चार उंदिरही मरण पावले होते किटकनाशक मिसळलेले पाणी सोडण्यात आले असावे ते पिऊन जनावर दगावली असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.ए पी एम सी अध्यक्ष निंगप्पा मोरे यांनी सांबरा येथे भेट देऊन शेतकऱ्यांचं सांत्वन केले. शेतकऱ्यांना शासनाने आर्थिक मदत करावी अशी मागणी केली जात आहे.