Saturday, January 11, 2025

/

खडक गल्ली प्रकरण मुस्लिम लीगचे राष्ट्रीय उपाध्यक्ष अटेकत

 belgaum

खडक गल्ली दगडफेक जाळपोळ प्रकरणी मार्केट पोलिसांनी आणखी दोघांना अटक केली असून त्यांची कारागृहात रवानगी केली आहे. राजू आगा वय 47 कोतवाल गल्ली , मोहिद्दीन आगा वय 30 कोतवाल गल्ली अशी अटक केलेल्या दोघांची नाव आहेत.अटक केलेले दोघेही काका पुतण्या असून राजू आगा हे इंडियन मुस्लिम लीग चे राष्ट्रीय उपाध्यक्ष आहेत

Market ps

बुधवारी रात्री खडक गल्ली चव्हाट गल्ली जालगार गल्ली घी गल्ली परिसरात दोन गटात तुफान दगडफेक करून अनेक वाहनांची जाळपोळ करण्यात आली होती त्यानंतर पोलिसांनी त्यांची रवानगी गुलबर्गा कारागृहात करण्यात आली होती त्यानंतर पोलिसांनी ही दुसरी कारवाई करत दोघांना अटक केली आहे. या दोघांवर ipc कलम 143,147,148,153अ,324,307,332,333,353,427,435,504, सह कलम 149 दोन धर्मात तेढ निर्माण करणे,सार्वजनिक मालमतेच नुकसान करणे,शिवीगाळ करणे,आग लावणे,खून करण्याचा प्रयत्न करणे असे गुन्हे नोंद करण्यात आले आहेत.

कारवाई नंतर मार्केट पोलीस स्थानकातअनेक माजी नगरसेवक हजर होते  राजकीय दबावातुन अटक झाली असल्याचा आरोप करत होते तर दुसरीकडे पोलिसांनी सबळ पुराव्यातूनच त्यांची अटक झाली असल्याच स्पष्ट केलं आहे

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.