बस डे च औचित्य साधून मुख्यमंत्री सिद्धरामय्या सोमवारी सिटीबस मधून प्रवास करणार आहेत.जनतेनी बस प्रवास करावा याच्या जनजागृती साठी वायव्य कर्नाटक परिवहन मंडळाच्या वतीने प्रत्येक महिन्याच्या 20 तारखेला बस डे गेल्या जुलै महिन्या पासून आयोजित करण्यात येत आहे.
बस डे च आयोजना बद्दल अद्याप कुणालाच कल्पना नव्हती मात्र या मोहिमेची जनजागृती खुद्द मुख्यमंत्री करणार आहेत सिद्धरामय्या सोमवारी बेळगाव सी बी टी बस मधून प्रवास करून हलगा विधान सौध कडे जाणार आहेत.बेळगावातील हिवाळी अधिवेशनात जाण्यासाठी पहिल्यांदाच मुख्यमंत्री सरकार बस मधून प्रवास करून जनतेने बस चा वापर करा असे आवाहन करणार आहेत.
20नोव्हेंम्बर रोजी राज्य परिवहन मंडळाचे सर्व कर्मचारी अधिकारी कार्यालयात येण्यासाठी खाजगी वाहनांचा वापर न करता बस मधूनच प्रवास करणार आहेत तसे आदेश परिवाहन मंडळा कडून देण्यात आले आहेत