बेळगाव तालुका समितीतून बाहेर पडून राष्ट्रीय पक्षात गेलेल्या मंडळींना पदांची खैरात वाटली जात आहे. स्वगृही हाती काहीच न लागलेल्यांना ही पदे खुणावू लागली असून नेत्यांनी आतातरी शहाणे होण्याची गरज आहे.
बेळगाव तालुका समितीला खिंडार पाडून एस एम बेळवटकर या युवा कार्यकर्त्याला काँग्रेस ने आपल्याकडे ओढले, एक दोन महिन्यातच त्याला जिल्हा काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस बनवण्यात आले आहे. समिती नेते बेळवटकर गेला तर काय फरक पडत नाही असे म्हणत असताना त्या पक्षाने दिलेला मान पाहून हबकून जात आहेत.ज्या तालुका समितीत बेळवटकर चिटणीस होते त्यांची हकालपट्टी करून त्यांचं रिक्त पद दुसऱ्या युवकाला देण्या ऐवजी तो गेल्याने काहीच फरक पडणार नाही अशी भाषा नेत्यांकडून होत आहे.
मीच नेता आणि माझ्यापेक्षा कोणच नेता नाही असे वागणारे नेतेच याला कारणीभूत आहेत. सभा समारंभ आणि महामेळावा यशस्वी करताना यांना युवक पाहिजेत मात्र कार्यकारणी तसेच व्यासपीठावर हेच नेते बसणार, असे चालले असून यातूनच युवा समूह बाहेरची वाट धरत आहे.
पैसे खाण्याची, वाटण्याची आणि राष्ट्रीय पक्षांशी सेटलमेंट करण्याची शिकवण देणारे आणि युवकांनी फक्त भावना जपावी असे सांगणारे समितीचे ग्रामीण भागातील नेते आतातरी शहाणे होतील का?
की अजूनही ते खिंडारे पाडवण्यास हातभार लावतच राहणार?
Trending Now