गेल्या पाच वर्षात राज्यात आमचे गाव, आमचा रस्ता योजनेंतर्गत एकूण 10898.58 किलो मीटर रस्ताकाम झाले आहे, त्यापैकी बेळगाव जिल्ह्यात 1018 किलो मीटरचा रस्ता करण्यात आला आहे, अशी माहिती ग्रामविकास आणि पंचायत राज मंत्री एच. के. पाटील यांनी दिली.
विधान परिषदेत आमदार बसवराज पाटील-यत्नाळ यांनी विचारलेल्या प्रश्नावर ते बोलत होते. मंत्री पाटील म्हणाले, राज्यभर आमचा गाव, आमचा रस्ता हि योजना राबविण्यात आली आहे. त्यासाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून दिला आहे. त्यामुळे राज्यात आतापर्यंत 10898.58 किलो मीटर रस्ताकाम झाले आहे. त्यापैकी बेळगाव जिल्ह्यात 1018 किलो मीटरचा रस्ता करण्यात आला आहे. बेळगाव जिल्ह्यात 1224 किलोमीटर रस्ता करण्याचे उद्दिष्ट्य होते. त्यासाठी 550 कोटी 51 लाख रुपयांची तरतूद करण्यात आली होती. पण निर्धारित रस्ता काम झाले नसल्यामुळे 370 कोटी 23 लाख रुपयांचा निधी खर्च झाला आहे. हे रस्ते करताना प्रधान मंत्री ग्राम सडक योजनेची मार्गसूची अवलंबवण्यात आली आहे. त्यामुळे रस्ते चांगल्या दर्जाचे झाले आहेत.
यावर आमदार पाटील-यत्नाळ यांनी रस्ता झाल्यानंतर काही दिवसातच तो अनेक कारणांनी खोदण्यात येतो. त्यामुळे रस्त्यांचे मोठे नुकसान होत असते. त्यामु रस्त्यांवर खोदाई करणाऱयांवर कारवाई करण्यात यावी, अशी विनंती करण्यात आली. रस्ता तीन टप्प्यात करण्याच्या सूचना संबधितांना देण्यात आल्या आहेत, अशी माहितीही मंत्री पाटील यांनी दिली
Trending Now