Thursday, January 9, 2025

/

स्लीपर कोच बसमध्ये बेकायदेशीर लैंगिक कृत्य -जयमाला

 belgaum

MLC Jayamala

राज्य परिवहन मंडळाच्या स्लीपर कोच  बसेस मध्ये लैगिंक व्यवहार सह अनेक बेकायदेशीर कृत्य सुरू असतात यावर निर्बंध घाला अशी मागणी आमदार जयमाला यांनी विधान परिषदेत केली

बसेस मध्ये अशी कृत्य सुरू असताना परिवहन मंत्र्यांनी हा प्रवाश्यांचा खाजगी विषय आहे असं म्हणत फेटाळून लावला. अजून आम्हाला स्लीपर बस मध्ये बेकायदेशीर कृत्य सुरू असलेली आमच्या निदर्शनास आली नाहीत  नियमानुसार स्लीपर बस मध्ये पडदा लावण्यात येतो मात्र सीसी टी व्ही बसवण्या बाबत विचार करू अस परिवहन मंत्री एक. एम. रेवण्णा  म्हणाले.
राज्य परिवाहन मंडळाच्या बस मध्ये महिलांना सिंगल बेड असतो मात्र बेकायदेशीर कृत्यांची चौकशी करू अस ते म्हणाले

बस प्रवासात महिला प्रवाशांना कोणत्याही प्रकारच्या समस्या  होऊ नये, यासाठी सरकारने ०८०-४९५९६६६६ ही चोवीस तास हेल्पलाईन सुरु केली आहे,
, सरकारी सलीपर कोच बसमध्ये कोणत्याही प्रकारची बेकायदा घटना घडल्याची माहिती सरकारपर्यंत आलेली नाही. महिला प्रवाशांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये, यासाठी सरकारने योग्य ते पाऊल उचलले आहे. सर्व वाहक आणि चालकांना महिलांशी आदबीने वागण्याच्या सूचना आणि प्रशिक्षणही दिले आहे. रात्रीच्या वेळी प्रवाशांना त्रास होऊ नये, यासाठी सर्व सुविधा देण्यात आल्या आहेत. स्लीपर कोच बसेसमध्ये प्रवाशांसाठी वीज, पडदे यांची सोया आहे. प्रवाशांसाठी इ-बुकिंग व्यवस्था आहे. महिलांना कोणत्याही प्रकारची गैरसोय जाणवल्यास त्या ०८०-४९५९६६६६ या चोवीस तास हेल्पलाईनवर संपर्क साधू शकतात. तत्काळ संबंधित वाहक, चालकांना सूचना देण्यात येतात. शिवाय पोलीस स्थानकातही तक्रार देता येऊ शकते.या चर्चेत जयमाला यांच्यासह मोटम्म यांनीही सहभाग घेतला.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.