मराठी संस्कृती आणि साहित्याची जपणूक करण्यासाठी बेळगाव शहर आणि ग्रामीण भागात दरवर्षी गावोगावी साहित्य सम्मेलने होतात, यंदा या पर्वाला उद्या पासून सुरुवात होणार आहे.
उद्या १८ नोव्हेंबर रोजी बाल साहित्य सम्मेलन होईल. २६ नोव्हेंबर ला कारदगा येथील सम्मेलन होणार आहे.
डिसेंम्बर महिन्यात १० रोजी बेळगुंदी, २४ रोजी सांबरा आणि ३१ रोजी माचीगड सम्मेलन होईल.
जानेवारी महिन्यात ७ तारखेला कुद्रेमनी, १४ तारखेला कडोली तर २१ तारखेला उचगाव येथील मराठी साहित्य सम्मेलन होईल.येळ्ळूर आणि निलजी सम्मेलनांची तारीख अजून ठरली नाही. असे समजते.