१९३१ च्या जुन्या मॉडेलच्या विंटेज कार मधून नगर प्रशासन मंत्री ईश्वर खंडरे यांनी सरकारी विश्राम धाम ते सुवर्ण विधान सौध पर्यंत प्रवास केला आहे. शुक्रवारी सकाळी नगर प्रशासन मंत्री मुख्यमंत्र्यांच्या भेटीला शासकीय विश्राम धमात गेले होते त्याचवेळी मुख्यमंत्र्यांना भेटायला चिकोडीचे खासदार प्रकाश हुक्केरी आणि त्यांचे आमदार पुत्र गणेश हुक्केरी आपली जुन्या मॉडेलची विंटेज कार घेऊन आले होते त्यावेळी मंत्री खंडरे याना जुन्या गाडीचा मोह आवरला नाही अन त्यांनी सर्किट हाऊस ते सुवर्ण सौधच्या प्रवास आपल्या शासकीय गाडीतून न करता विंटेज मधून केला .
आमदार गणेश हुक्केरी यांनी विंटेज कार चालावली अन मंत्र्यांना सौध पर्यंत घेऊन आले . जुनी विंटेज कार सुवर्ण सौध मद्ये येताच सर्व पत्रकारांनी फोटो घेण्याची गर्दी केली होती . यावेळी माजी मंत्री उमेश कती यांनी विंटेज बघून पत्रकारांकडे हातवारे करत प्रकाश हुक्केरी किती उचलत आहेत बघा चिमटा काढण्याचा प्रयत्न केला .