मराठी भाषा, मराठी अस्मिता, मराठी संस्कृती, शिवाजी महाराजांचा तेजस्वी वारसा हे सर्व जपण्याची आणि समृद्ध करण्याची जबाबदारी इतिहासानं आपल्यावर सोपवली आहे. मराठी तरुणांनी तो वसा घेतला पाहिजे अस आवाहन साहित्यिक गुणवंत पाटील यांनी काढले.
बेळगावातील शिवसेना कार्यलयात शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा पाचवा स्मृतिदिन कार्यक्रमात सहभागी झाल्या वर बोलत होते.
आपण सर्वजण मिळून संयुक्त महाराष्ट्राचा लढा पूर्ण करू बेळगावातील मराठी संस्कृती टिकवण्यासाठी प्रयत्नशील राहू अस देखील पाटील म्हणाले.बेळगाव शिवसेनेचे प्रकाश शिरोळकर, चंदगड शिवसेना तालुका प्रमुख प्रभाकर खांडेकर, दिलीप बैलूरकर आदी उपस्थित होते