दुचाकी आणि चार चाकी वाहनावर कन्नडमधून नंबर प्लेट लावण्याची सक्ती नाही, अशी माहिती परिवहन मंत्री एच. एम. रेवण्णा यांनी दिली आहे.
कुडची विधानसभा मतदार संघाचे आमदार पी. राजीव यांनी वाहनांवरील नंबर प्लेटचा मुद्दा उचलून धरला आहे. प्रश्नोत्तर कालावधीमध्ये त्यांनी वाहनावरील नंबर प्लेट कन्नडमधून लावण्याची सक्ती का केली जात नाही, असा प्रश्न केला. त्यावर रेवण्णा म्हणाले,””कायद्याच्या चौकटीत कन्नडमधून नंबर प्लेट लावण्याची सक्ती करता येत नाही. इंग्रजीसोबत कन्नडमधून नंबर प्लेट लावण्यास काही हरकत नाही. हा निर्णय सर्वस्वी वाहन चालकांचा आहे, अशी माहिती दिली.
त्यावर आमदार राजीव यांनी शेजारच्या महाराष्ट्र राज्यात मराठीत वाहनावर नंबर प्लेट लावण्याची सक्ती केली आहे. त्याधर्तीवर कर्नाटक राज्यात कन्नडमधून नंबर प्लेट लावण्याची सक्ती करावी, अशी मागणी केली. त्यावर रेवण्णा यांनी नियम आणि कायद्यामध्ये याची तरतूद नाही. त्यामुळे कन्नड भाषेची सक्ती करता येत नाही. पण, कन्नडमधून नंबर प्लेट लावले तरी चालेल, अशी माहिती दिली.