खासगी वैद्यकीय रुग्णालय दुरुस्ती विधेयक मागे घ्यावे मागणीसाठी सलग तिसऱ्या दिवशीही खासगी डॉक्टरांनी आपली सेवा स्थगित ठेवल्यामुळे रुग्णांना उपचार करवून घेणे अवघड झाले आहे.
मंगळवारी हे विधेयक विधानसभेत आरोग्यमंत्री रमेशकुमार यांनी हे विधेयक मांडले आहे.आजही काँग्रेस विधिमंडळ सदस्यांची या विधेयकावर चर्चा करण्यासाठी बैठक झाली .त्यावेळी विधेयक मागे घ्यावे,दुरुस्ती करावी अशी मते बैठकीत व्यक्त झाली.तेव्हा आरोग्यमंत्री रमेशकुमार यांनी बैठकीतून बाहेर पडणे पसंद केले.रमेशकुमार हे विधेयक मंजूर करून घेण्यावर ठाम आहेत.जनतेचा विचार करून हे विधेयक मांडण्यात आले आहे.विधेयक रद्द झाले तर आपण राजकारणातून संन्यास घेऊ अशी ठाम भूमिकाही रमेशकुमार यांनी घेतली आहे.
कालपासून डॉक्टरांच्या राज्य संघटनेचे अध्यक्ष डॉ.रवींद्र यांनी कालपासून उपोषण सुरू केले आहे.आता दररोज उपोषणात प्रत्येक जिल्ह्यातील डॉक्टर सहभागी होत आहेत.डॉक्टर सरकारने अन्यायकारक विधेयक मागे घ्यावे या मागणीवर ठाम आहेत तर सरकार विधेयक मंजूर करून घेण्यावर ठाम आहे.पण यामध्ये रुग्णांना समस्यांना तोंड द्यावे लागत आहे.
राज्यभरात खाजगी डॉक्टर च्या संपामुळे सहा जण दगावले आहेत दिवसेंदिवस डॉक्टर्स च्या संपला प्रतिसाद मिळत असून बेळगाव विधान भवना समोर आंदोलन करणाऱ्या डॉक्टर्स ची संख्या वाढतच आहे त्यामुळं सरकार मधले अनेक मंत्री आणि आमदार या विधयेकात दुरुस्ती साठी मुख्यमंत्र्यावर दबाव आणत आहेत मात्र मंत्री रमेश कुमार हे बदल करण्यास तयार नसून प्रसंगी राजीनामा देण्याची तयारी दर्शवली असल्याने यातील गुंता अधिक वाढला आहे.