बेळगाव प्रशासनाने महाराष्ट्रातील नेत्यांना घातलेल्या बंदीच्या आदेशाला केराची टोपली दाखवत राष्ट्रवादीच्या नेत्यांनी दाखविलेला सहभाग, प्रचंड दडपशाही आणि गळचेपी असताना देखील सीमा वासीय जनतेने मेळाव्यात सहभागी होऊन कर्नाटकी अधिवेशनास केलेला विरोध,अस्मिता दाखवत रहेंगे तो महाराष्ट्र नही तो जेल मे अश्या घोषणानी सारा वक्सीन डेपो मैदानात दणाणून सोडत महा मेळावा यशस्वी केला तर बेळगाव वर आपला हक्क सांगण्यासाठी आयोजित केलेल्या हिवाळी अधिवेशांचा मात्र फज्जा उडाला पहिल्या दिवशी केवळ विधान परिषदेत ४६ विधान सभेतही कमी आमदारांनी उपस्थिती लावली होती.बेळगाव वर आपला हक्क सांगण्यासाठी ज्या ज्या वेळी कर्नाटक सरकार हिवाळी अधिवेशन घेतंय त्या विरोधात महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने मेळाव्याचे आयोजन करण्यात येते वक्सीन डेपो मैदानाच्या बाजूच्या वनराईत एकीकरण समितीच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते जिल्हाधिकारी एस जिया उल्ला यांनी महाराष्ट्रातील नेत्यांना बेळगाव जिल्हा प्रवेश बंदी चा आदेश दिला होता अस असताना देखील कोल्हापूरचे खासदार धनंजय महाडिक ,माजी मंत्री आमदार जयंत पाटील चंदगडच्या आमदार संध्यादेवी कुपेकर,माजी आमदार के पी पाटील यांनी हजेरी लावली होती. बेळगाव कर्नाटक महाराष्ट्र सीमेवर सगळीकडे कडेकोट पोलीस बंदोबस्त असताना गनिमी काव्याने मार्ग बदलत महाराष्ट्रातील नेते आळीपाळीने मेळाव्यात दाखल झाले होते. महाराष्ट्रातील लोकप्रतिनिधींनी गनिमी काव्याने पोलिसांच्या डोळ्यात धूळफेक करून बेळगावात प्रवेश करून महामेळाव्यात सहभागी होऊन संपूर्ण महाराष्ट्र सीमावासियांच्या पाठीशी असल्याची ग्वाही दिली .मैदान देण्यास महानगरपालिकेने टाळाटाळ केल्यामुळे आणि पोलिसांनी परवानगी नाकारल्यामुळे महामेळाव्याचे व्यासपीठ आणि मंडप रस्त्यावर उभारण्यात आले . मराठी भाषिकांची जिद्द आणि जोश पाहून बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आलेल्या पोलिसांना देखील केवळ बघ्याची भूमिका घेऊन गप्प उभारावे लागले .
हिवाळी अधिवेशनात बेळगावचा मुद्दा लोकसभेत घुमवू -खासदार धनंजय महाडिक
केद्र सरकार बेळगावच्या बाबतीत उदासीन आहे पहिल्यांदाच खासदार म्हणून निवडून आलेलो आहे एक प्रभावी आणि अभ्यासू खासदार म्हणून माझी इमेज दिल्ली चांगली आहे. पुढील हिवाळी अधिवेशनात कर्नाटकाची ही दंडुकशाही लोकसभेत मांडू ज्या प्रमाणे महाराष्ट्र विधान सभेत बेळगावच आवाज उमटतो त्याच पद्धतीने महाडिक बेळगाव करांचा खासदार म्हणून बेळगावचा आवाज लोकसभेत घुमवू अस ठोस आश्वासन खासदार धनंजय महाडिक यांनी दिल आहे. आमदार संभाजी पाटील आमदार अरविंद पाटील ,समितीचे अध्यक्ष दीपक दळवी ,कार्याध्यक्ष मनोहर किणेकर ,माजी आमदार दिगंबर पाटील ,निंगोजी हुद्दार ,सरचिटणीस मालोजी अष्टेकर ,प्रकाश मरगाळे ,बिदर समितीचे अध्यक्ष रामराव राठोड आदी मान्यवर उपस्थित होते.जगात एक चांगली लोकशाही भारतात आहे विदेशात भारताच्या लोकशाहीच कौतुक होतंय मात्र बेळगावातील परिस्थिती पाहिल्यास वेगळ चित्र दिसतंय . रात्री बारा वाजता प्रवेश बंदीचा आदेश निघाल्यावर अनेक रस्ते मार्ग गाड्या बदलत खेडो पाड्या गल्ली बोळातून बेळगावात दाखल झालो आहोत बेळगावचा लढा एकाकी नाही महराष्ट्र तुमच्या पाठीशी आहे शरद पवार आणि त्यांची पूर्ण फौज संयुक्त महाराष्ट्राचा लढा पूर्ण करण्यासाठी आम्ही आलेलो आहोत असही त्यांनी पुढे नमूद केल. हा देश लोकशाहीचा आधार स्तंभ असणारा सगळ्या भाषण प्राधान्य झालेला देश आहे इथे बेळगावात मराठीची गळचेपी अन्याय आहे यात पेटून उठून मुझोर पणा दंडुक शाही मोडून काढा आगामी निवडणुकीत पुन्हा महाराष्ट्र एकीकरण समितीने विजयी व्हा असा देखील सल्ला दिला .
महाराष्ट्राने सीमाभागातील मराठी शाळांना अनुदान ध्याव – माजी मंत्री जयंत पाटील
कर्नाटक जर जत तालुक्यातील कन्नड शाळाला अनुदान देत असेल तर महाराष्ट्राने देखील सीमा भागातील मराठी शाळांना अनुदान देण्याचा विचार करायला हवा यासाठी आपण विधान सभेत प्रस्ताव आणू येणाऱ्या काळात महाराष्ट्र सरकार हि भूमिका नक्कीच स्वीकारेल आणि बेळगाव चा बेळगावी उचगाव उचगावी माजगाव मजगावी करणार मराठी गावाचं विद्रुपीकरण थांबवायला हव अशी मागणी माजी मंत्री जयंत पाटील यांनी केली आहे
ते पुढे म्हणाले की लोकशाहीतून लढणाऱ्या मराठी भाषिकाविरोधात दंडुकेशाही करण्याची भूमिका कर्नाटक सरकारची आहे कोल्हापूरहून येताना अनेक ठिकाणी पोलीस होते लोकांची आपली भूमिका व्यक्त करण्याची संधी द्यायची नाही मराठी भाषिकांचा आवाज दडपून टाकायचा महाराष्ट्रातून येऊन कोणीही आपली भूमिका मांडू नये यासाठी प्रवेश बंदी करायची स्थानीक सरकारची हि भूमिका दुर्दैवी आहे .सुप्रीम कोर्टात थोडासा विलंब होत आहे सध्याच्या महाराष्ट्र सरकारने या प्रश्नाकडे गांभीर्यान बघन गरजेचे आहे सध्याचे राज्यकर्ते दुसर्या भागातले आहे त्यांनी इकडे लक्ष द्यायला हव यची तळमळ असण गरजचे आहे आम्ही विरोधी गटात असलो तरी महाराष्ट्रातील संपूर्ण विधान सभा बेळगाव करांच्या पाठीशी आहे अस देखील ते म्हणाले .
महाराष्ट्राच्या मंत्र्याला कर्नाटक पोलीसा कडून अटक करून सुप्रीम कोर्टाच्या निदर्शनास आणून देण्याची नामी संधी होती चंद्रकांत दादा यांनी मेळाव्यात यायला हव होत अस देखील ते म्हणाले. घुसखोरी करण्यासाठीच उप्रज्याधानीचा दर्जा देण्याचा घाट कर्नाटक सरकारने घातला असून लोकांची महाराष्ट्रात जाण्याची इच्छा कमी होत नाही म्हणूनच केलेला हा विधान सभा अधिवेशन घेण्याचा आहे. पाहिलं अधिवेशन मुंबई दुसर नागपूर तर सुप्रीम कोर्टाच्या निकाला नंतर महाराष्ट्रच तिसर अधिवेशन बेळगावात घेऊ अस देखील ते म्हणाले
समिती आमदारांचा सभात्याग
पहिल्या दिवशी बेळगावातील अधिवेशनात महाराष्ट्र एकीकरण समितीचे आमदार संभाजी पाटील आणि अरविंद पाटील हे दोघेही भगवा फेटा परिधान करून सभागृहात सामील झाले होते . विधानसभेच्या सुरुवातीलाच श्रद्धांजली वाहताना आमदार अरविंद पाटील यांनी मराठीतून बोलण्याचा प्रयत्न केला मात्र उपस्थित आमदारांनी मराठी बोलायला विरोध केल्यावर दोन्ही आमदारांना सभात्याग केला अन एकीकरण समितीच्या मेळाव्यात सहभागी झाले .
पवारांच्या आदेशानेच गनिमी कावा
जिल्हाधिकारी एस जिया उल्ल्ला यांनी महाराष्ट्रातील नेत्यांना घातलेल्या प्रवेश बंदी नंतर सर्व प्रथम माजी आमदार के पी पाटील त्या नंतर चंदगड च्या आमदार संध्यादेवी कुपेकर सहभागी झाल्या होत्या जयंत पाटील हे बेळगाव कोल्हपुर अंतर १८० की मी प्रवास करत चंदगड तालुक्यातून वेगवेगळ्या गाड्या बदलून मेळाव्यात सहभागी झाले तर खासदार धनंजय महाडिक देखील वेगळ्या मार्गाने सहभागी झाले. महाराष्ट्र एकीकरण समितीचेअनेक कार्यकर्ते दुचाकी वेगवेगळ्या चार चाकी वाहनातून मेळाव्याकडे महाराष्ट्रातील नेत्यांना आणत होते. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या आदेशामुळेच हे सर्व नेते बंदी झुगारून बेळगावात दाखल झाले होते .