महाराष्ट्र एकीकरण समितीच्या महा मेळाव्यास महाराष्ट्रातील नेत्यांना प्रवेश बंदीचा आदेश जिल्हाधिकारी एस जिया उल्ला यांनी बजावल्या नंतर कर्नाटक पोलिसांनी महाराष्ट्राच्या सर्व सीमा सीलबंद केल्या आहेत.
पुणे बंगळुरू राष्ट्रीय महा मार्गावरील निपाणी जवळ कोगनोळी चेक पोस्ट वर पोलिसांचा कंडोकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.सर्व खाजगी आणि सरकारी वाहन तपासून कर्नाटकाच्या दिशेने सोडण्यात येत आहेत.येथे बराच ट्रॅफिक जॅम झाला आहे.
चंदगड कडून असणारी शिनोळी येथील सीमेवर देखील पोलिसां कडून तपासणी करण्यात येत आहे.