आज होणाऱ्या महा मेळाव्यास महाराष्ट्रातून येणाऱ्या नेते मंडळींना बंदी घालण्याचा आदेश जिल्हाधिकारी एस जिया उल्ला यांनी बजावला आहे.12 नोव्हेंम्बर रात्री 10 ते 14 नोव्हेंम्बर रात्री 12 पर्यंत या काळात बेळगाव जिल्ह्यात प्रवेश बंदी करण्याचा आदेश जिल्हाधिकार्यानी रात्री उशिरा बजावला आहे .
समितीच्या मेळाव्यात महाराष्ट्रातील राजकीय नेते सामील होऊंन भाषिक तेढ निर्माण करायची शक्यता आहे ,राज्य सरकार कन्नड विरुद्ध भडकावू भाषण द्यायची शक्यता आहे त्यामुळं जिल्हा प्रशासनाने ही बंदी घातली असल्याचं देखील आदेशात नमूद करण्यात आलं आहे.
बेळगावात प्रवेश करणाऱ्या महाराष्ट्रातील नेत्यांवर कायदेशीर कारवाई केली जाईल असा देखील स्पष्ट केलं आहे.बंदी असताना राष्ट्रवादी किंवा इतर नेते बेळगावातील समितीच्या मेळाव्यात सहभागी होतील का हा प्रश्न महत्वाचा आहे