सोमवारी कर्नाटक विधी मंडळाच्या अधिवेशना विरोधात एकीकरण समितीच्या मेळाव्यात हसन मुश्रीफ,जयंत पाटील,के पी पाटील राष्ट्रवादीचे प्रतिनिधी म्हणून सहभागी होतील अशी माहिती राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी दिली आहे.
मेळाव्यास परवानगी मिळो न मिळो राष्ट्रवादीचे नेते समितीच्या मेळाव्यास हजर रहातीलच सुरुवाती पासून राष्ट्रवादी बेळगाव च्या मराठी माणसाच्या पाठीशी आहेच अस देखील ते म्हणाले.