बेळगाव शहराचा पारा घसरला असून रविवारी रात्री किमान तापमान 13.3,डिग्री सेल्सियस पर्यंत खाली उतरला म्हणजेच बेळगाव शहराच्या नॉर्मल तपमानापेक्षा 4 डिग्री कमी होत तर 29.2 डिग्री सेल्सियस किमान तापमान नोंद करण्यात आली.हवामान खात्याच्या सूत्रा नुसार पुढील दिवसात बेळगावचा पारा आणखी घसरण्याची शक्यता आहे पुढील आठवड्यात बेळगावच तापमान 10 ते 12 डिग्री सेल्सियस असू शकतं त्यामुळे हिवाळी अधिवेशना साठी बेळगावात आलेले मंत्री आमदार अधिकारी यांना गुलाबी थंड अनुभवता येणार आहे.
18 नोव्हेंम्बर 2012 हा दिवस 7.7डिग्री सेल्सियस हा नोव्हेंम्बर महिन्यातील सर्वात अधिक थंड दिवस होता.नोव्हेंम्बर ते जानेवारी बेळगावातील थंड हवामान प्रसिद्ध असते त्यामुळं बेळगाव कडे अनेक जण खेचले जातात म्हणूनच गरिबांच महाबळेश्वर म्हणून प्रसिद्ध आहे. सुखी नाक फुटलेले ओठ ही दृश्य या मोसमात दिसत असतात