एकीकडे बेळगाव इतर जिल्ह्यातील पोलीस बंदीबस्ता साठी बेळगावला आले असताना शहरातील कांदा मार्केट,रविवार पेठ परिसरातील दुकानाचे शटर तोडून दुकानातील किरकोळ चिल्लर रक्कम चोरी केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
कांदा मार्केट येथील पाटनेकर जनरल स्टोअर च शटर लॉक तोडून चोरट्यानी चिल्लर रक्कम 4 हजार रुपये लांबविले आहेत या शिवाय तुपद, चौगुले ,भातकांडे अश्या सात ते 8 दुकानातून चोरीचे प्रयत्न तर काही ठिकाणी किरकोळ चिल्लर चोरी करण्यात आली आहे.
या प्रकरणी बेळगाव live ने मार्केट पोलिसांना संपर्क केला असता याची त्यांना कल्पना देखील नव्हती.
अधिवेशनात व्यस्त असलेल्या पोलिसांनी शहरातील कायदा सुव्यवस्थेकडे देखील लक्ष ध्याव अशी मागणी केली जात आहे