हवेतला गारठा जसजसा वाढतो तसतसे टॉन्सीलस्च्या इन्फेक्शनचे प्रमाणही वाढते. गार हवा, मस्त थंडी, हिवाळा यांची सुरूवात झाली की समस्त बच्चेमंडळीचे घसे दुखायला सुरूवात होते. घशात असतातच लहान मुलांचे दुश्मन ’टॉन्सीलस’! टॉन्सीलस् म्हणजे संरक्षक पेशींचा, एक समूह असतो. कोणत्याही प्रकारच्या सूक्ष्म जीवांना श्वसन संस्थेपर्यंत पोहोचू न देण्याचे काम टॉन्सीलस् करतात. अशाच आणखी एक पेशी असतात. ”अॅडिनॉईडस्” या सुध्दा पेशी/ ग्रंथी संरक्षणाचेच काम करतात. घसा दुखणे या लक्षणामध्ये टॉन्सीलस्, अॅडीनॉईडसना सूज येणे, त्या सुजन लाल होणे, घसा खवखवणे, ताप येणे, खोकला येणे इत्यादी प्रकार दिसून येतात.
कारणे- लहान मुलांची प्रतिकारशक्ती कमी झाल्यास अॅडिनोव्हायरस, एंटेरोव्हायरस, ईबीव्हायरस या विषाणूंमुळे तर स्ट्रेप्टोकोकस, मायकोप्लाझमा, न्यूमोनिया किंवा कँडिडा अल्बीकन्स या इतर सूक्ष्मजीवांमुळे टॉन्सीलचे इन्फेक्शन अर्थात दाह होऊ शकतो. काही मुलांना तर हा त्रास वारंवार होतो. महिन्यातून एकदा दोनदा असे इन्फेक्शन होतेच.
लक्षणे- वारंवार होणार्या टॉन्सीलायटीस, अॅडीनॉटियस या लिम्फनोड दाह विकारांमध्ये घशात खवखवणे, घसा दुखणे, घसा लाल होऊन गिळता न येणे, टॉन्सीलस्वर ’पू’ चे ठिपके दिसणे, भरपूर ताप येणे, सर्दी होणे, खोकला येणे अशी लक्षणं आढळून येतात. गळ्यावर बाहेरूनसुध्दा टॉन्सीलस्ना आलेली सूज दिसून येते. या विकारात तापसुध्दा खूप येतो. अशक्तपणा, गिळता न आल्यामुळे उलटी होणे, मुल किरकिरी होणे असे प्रकार आढळू येतात.
टॉन्सीलायटीस जर स्ट्रेप्टोकोकस नावाच्या जंतूमुळे होत असेल आणि हे इन्फेक्शन जर आटोक्यात आणले नाही तर हा जंतू रक्तात पसरतो आणि त्यातून संधीवात, किडनीदोष उत्पन्न होऊ शकतात. तसेच घशातून हे इन्फेक्शन कानात पसरून कानात पू होऊ शकतो. यासनीसीससुध्दा गच्च होऊन सायनोसायटीस होऊ शकतो.
सततच्या टॉन्सीलायटीसमुळे मुलं किरकिरी होतात. जेवत नाहीत, अंग धरत नाहीत, वाढ खुंटते, घसा कोरडा पडतो, नाक गच्च होते. त्यामुळे रात्री झोपेत तोंड उघडे राहते. तोंडाने श्वासोच्छवास होतो. अशाने घशाचा दाह तर होतोच शिवाय मुखदुर्गंधी येते.
उपचार- पूर्वी या विकारावर हमखास उपचार म्हणजे शस्त्रक्रिया असायची. परंतु असे केल्याने जंतूना सरळ फुफ्फुसापर्यंतचा मार्ग मोकळा करून दिल्यासारखे आहे. हा काही पर्याय नव्हे. यावर सर्वात योग्य उपाय होमिओपॅथिच आहे. आजपर्यंत टॉन्सीलायटीसच्या कितीतरी रूग्णांना होमिओपॅथिचा गुण आलेला आहे. किमान सहा महिने तरी औषधं घ्यावी लागतात.
होमिओपॅथि- होमिओपॅथिमुळे विकाराचे समूळ उच्चाटन शक्य होते. दुष्परिणाम न होता किडनी, सांधे सांभाळून उपचार शक्य होतात. ब्रायोनिया, कॅल्केरिया कार्ब, मर्कसॉल, ड्रॉसेरा, बेलाडोना, हिपारसल्फ अशी अनेक औषधं व्यक्तीतत्वानुसार वापरता येतात.
बायोकेमिक- नॅट्रमसल्फ 6×, सिलीशिया 12× यांचा उपयोग होतो.
इतर- निसर्गोपचारामध्शे तात्कालिक घसादुखीचा काही उपचार उपयुक्त होतात. या उपचारांमुळे तात्पुरता घसा वगैरे दुखायचा कमी होतो.
आंबा- आंब्याच्या सालीचा रस गरम पाण्यात टाकून गुळण्या कराव्यात. साल उगाळून घशाला बाहेरून लावल्याने दाह कमी होतो.
बेहडा- बेहड्याची 2 ग्रॅम पूड, पाव चमचा मीठ, अर्धा चमचा मिरपूड आणि 2 दोन चमचे मध, एकत्र करून खावे.
मेथी- मेथीदाणे पाण्यात टाकून उकळावे. या पाण्याने गुळण्या कराव्यात.
लिंबू- कोमट पाण्यातील लिंबाचे सरबत हळुहळू प्यावे. आराम वाटतो.
मीठ व खाण्याचा सोडा कोमट पाण्यात घालून गुळण्या केल्याने टॉन्सील वरचे जंतूआवरण कमी होऊन सूज कमी होते व होमिओपॅथिक उपचारांनी हा विकार पूर्ण बरा होतो.
डॉ सोनाली सरनोबत
केदार क्लिनिक 9916106896
सरनोबत क्लिनिक 9964946918