कर्नाटकचे हिवाळी अधिवेशन बेळगावात होतेय. या अधिवेशन काळात बेळगावला पोलीस छावणीचे स्वरूप येणार आहे. १३ नोव्हेंबर पासून सुवर्णसौध पासून १ किमी च्या कक्षेत १४४ कलम लागू करण्यात येणार आहे.
३५९० पोलीस बंदोबस्तासाठी दाखल होत आहेत. सुवर्णसौध च्या बाहेर शेतवडीत आंदोलकांना आपला आवाज व्यक्त करता येईल, रोज सायंकाळी ४ पर्यंतच आंदोलन करता येणार असून रीतसर परवानगी घेऊनच तेथे दाखल होता येणार आहे.
आजवर १९ संघटनांनी आंदोलनासाठी परवानगी मागितली आहे, अशी माहिती पोलीस आयुक्तालयाने दिली आहे.
Trending Now