सात एकर मध्ये विखुरलेल्या कणबर्गी तलावाचा स्मार्ट सिटी योजनेंतर्गत मेकओव्हर केला जाणार आहे. यामुळे स्थानिकांसाठी किल्ला तलाव नंतर आणखी एक आकर्षण होणार आहे.
या मेकओव्हर साठी ४ कोटी २८ लाख ३० हजार ९३३ इतका खर्च अपेक्षित असून ९ महिन्यांचा कालावधी लागणार आहे. स्मार्ट सिटी योजनेंतर्गत काढलेल्या कामांच्या निविदापैकी ही आठवी निविदा आहे.
२०१८ मध्ये हे काम सुरू होईल.चारी बाजूनी तलावाचे सौदर्यीकरण होणार आहे. सुंदर फुले, वॉकिंग पथ, २८ बाकडी, २ पाणपोई, हरित गवत यांचा समावेश होईल.
Trending Now