राज्यात शेतकरी एकीकडे आत्महत्त्या करीत असतानाच 13 नोव्हेंम्बर पासून सुरू होणाऱ्या हिवाळी अधिवेशन काळातच आमदार मौज करण्यासाठी दोन दिवस कारवार दौऱ्यावर जाणार आहेत..
आमदारांना राज्यातील ज्वलंत समस्यांचे गांभीर्य न उरल्यानेच की काय कारवार नाविक दलाच्या सी बर्ड प्रकल्पाच्या पहाणीच निमित्य काढून हे आमदार दोन दिवस दौऱ्यावर जाणार आहेत शनिवार 18 रविवार 19 नोव्हेंम्बर रोजी हा दौरा आयोजित करण्यात आला आहे.विशेष म्हणजे ही संधी पहिल्या टप्प्यात विधान परिषद सदस्यांनाच उपलब्ध होणार असून विधानसभा सदस्यांनाही या संधीचा लाभ मिळण्याची शक्यता आहे.
राज्यात प्रामुख्याने बंगळुरू राजधानो परिसरात अतिवृष्टीने थैमान घातले असून फार मोठ्या प्रमाणात पीक आणि खाजगी मालमत्तेच नुकसान झालं आहे राज्यधानीत अतिवृष्टीने होणारी वाताहत रोखण्यासाठी उपाययोजना करण्याचे प्रयत्न करण्यास शासन विफल ठरले आहेअसे असताना या प्रश्नी सिद्धरामय्या सरकारला धारेवर धरून या समस्येवर कायमचा तोडगा काढणे त्यांनी गरजेचे होते मात्र कारवारची ट्रिप आयोजित करून जनतेच्या ज्वलंत प्रश्नाकडे दुर्लक्ष केल्याची टीका सार्वत्रिक पणे होताना दिसते आहे. बेळगावच्या या दहा दिवसीय अधिवेशनावर 26 कोटींचा खर्च अपेक्षित असताना कारवार दौरा म्हणजे सरकार ला अधिक भुर्दंड ठरणारा आहे.सभागृहाच्या कामकाजाचा कंटाळा घालवण्यासाठी आमदारांनी कारवारात श्रम परिहार करणार असल्याची चर्चा आहे.
आता या दौऱ्यावर लाखो रुपयांची उधळपट्टी होण्याची शक्यता नाकारता येत नाही आधीच विधान सभेच्या दैनंदिन कामकाजात आमदार अधिक रस घेताना दिसत नसल्याची तक्रार आहे अश्या पहाणी दौऱ्याना आमदार मात्र अधिक रस दाखवतात.ज्यावेळी सरकारने बेळगावात सुवर्ण विधान सौध बांधलं त्यावेळी उत्तर कर्नाटकाचा विकास हा मुख्य अजेंडा होता तो अश्यामूळ मागे पडताना दिसत आहे.