Wednesday, December 25, 2024

/

विधानसभेच्या तोंडावर भगव्याचा पुळका आताच का?भाऊ गडकरी यांच खरमरीत खुलं पत्र

 belgaum

परवा परवा बऱ्याच हिंदू संघटनांनी टीपुसुलतान जयंती च्या विरोधात जिल्हाधिकारी कार्यालयावर जोरदार मोर्चा काढून निदर्शने केली .बरं वाटलं. पण त्यावेळी ग्रामीणचे बीजेपी चे आमदार  संजय पाटील यांनी अगदी पोटतीडकीने भावनाविवश होऊन बोलण्याचा आव आणला असं जनतेला वाटलं. पण???????
ज्यावेळी महानगर पालिकेवरचा भगवा झेंडा काढून ,त्यासाठी अमाप पैसा खर्च करून नवीन इमारत बांधली आणि काही करून माझ्या राज्यांचा झेंडा हटवला तेव्हा कर्नाटक राज्यात तुमचंच सरकार होतं ,आणि तुम्ही आमदार खासदार अंगडी खासदार होतात .मग तुम्ही भगवा झेंडा काढायला का विरोध केला नाही …? भगवा झेंडा कुठल्या भाषेचा किंवा जातीचा नाही तर संपूर्ण हिंदूंचा ,संपुर्ण हिंदुस्तानचा आहे हे तुम्ही कसं काय विसरलात? आता कसा काय एवढा हिंदू बद्दल आणि भगव्याबद्धल पुळका आला ?हा जनतेला पडलेला प्रश्नच न्हवे तर विधानसभेच्या निवडणुका जवळ आलेत आणि म्हणूनच तुम्ही हिंदू जनतेच्या डोळ्यात धूळफेक करून जनतेची मने जिंकण्याचा दुर्दैवी प्रयत्न करत आहात .हे जनता अगदी हृदयातून जाणून आहे .
जर तुम्ही खरोखर हिंदू असता तर आम्हाला असा दुर्दैवी अनुभव आला नसता ,वाईट एवढच वाटतय की तुम्ही माझ्या राज्यांचा स्वतःच्या स्वार्थासाठी वापर करून घेताय ,निवडणुकीला अगदी आठवणीने गाडीला भगवा झेंडा आणि डोकीला भगवा फेटा बांधून प्रचार करता ,सीमाभागात भगवा झेंडा न वापरता आणि मराठी न बोलता निवडणूक लढवून जिंकून दाखवा ,शक्यच नाही ,आणि दुर्दैवाने तसं झाल्यास मी तुमच्या घरी चाकरी करेन ,किंवा तुम्ही सांगाल तसंच वागेन ,हा मेसेज सम्पूर्ण जगातील लोक बघतात ,लोक ह्या तुमच्या नाटकी वागण्याला ओळखुन आहेत.

भाऊराव गडकरी ,एक हिंदू मराठा
अध्यक्ष : मराठी भाषिक युवा आघाडीBHau gadkari

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.