13 नोव्हेंम्बर पासून बेळगावात सुरू होणाऱ्या कर्नाटक सरकारच्या हिवाळी अधिवेशना सहभागी होण्यासाठी येणाऱ्या महनियांची जेवण राहणे आणि वाहनांची सोय करण्यात आली असल्याची माहिती जिल्हाधिकारी एस जिया उल्ला यांनी दिली आहे.
शुक्रवारी पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी ही माहिती दिली आहे अधिवेशनाच्या तयारीची माहिती देण्यासाठी पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते.
या अधिवेशनात साडे चार हजार अधिकारी तसेच सहा हजार पोलीस शेकडो महनीय लोकांचा समावेश असणार आहे यांच्या राहण्यासाठी बेळगाव हुबळी आणि धारवाड येथे 1700 हुन अधिक खोल्या बुक करण्यात आल्या आहेत तसेच अधिकारी आमदार मंत्र्यांना वाहनांची व्यवस्था करण्यात आली आहे अस देखील डी सी म्हणाले.
कोण आमदार मंत्री कोणत्या हॉटेल लॉज वर राहणार आहेत याची माहिती जनतेला कळण्यासाठी लहान पुस्तिका प्रिंट करण्यात आली आहे विविध अधिकारी महनीय व्यक्तींना लॉज मध्येच सकाळ चा नाष्टा रात्रीच जेवण सोय केली आहे.बंदोबस्त सी सी टी व्ही आणि बॅरिकेट्स साठी पोलीस दलास अनुदान उपलब्ध करून देण्यातआलं आहे अशी माहिती देखील जिया उल्ला यांनी दिली.
राज्य सरकारच्या सचिव लेव्हल च्या अधिकाऱ्या करिता मेरियोट हॉटेल च्या 80 खोल्या आरक्षित करण्यात आल्या आहेत इफा आणि संकम हॉटेल मध्ये आमदारांच्या राहण्याची तर आदर्श आणि सन्मान हॉटेल मध्ये कार्यदर्शी आणि मुख्य कार्यदर्शी लेव्हल चे अधिकारी वास्तव्यास असणार आहेत
मुख्यमंत्र्या सह पी डब्ल्यू डी मंत्री,ऊर्जा मंत्री,महसूल मंत्री आणि सी एम ऑफिस अधिकाऱ्यांची सोय बेळगाव सरकारी विश्राम धाम(pwd) मध्ये करण्यात आली आहे.सुवर्ण विधान सौध पहायला येणाऱ्या विध्यर्थयाना विधान सौध च्या गेट पासून सौध पर्यंत खास बस ची सोय देखील केली जाणार असल्याची माहिती देखील एस जिया उल्ला यांनी दिली.