कर्नाटक सरकारच्या विधी मंडळाच्या बेळगावातील अधिवेशन आयोजनाच्या विरोधात महाराष्ट्र एकीकरण समितीने आयोजित केलेल्या महा मेळाव्यास वक्सीन डेपो येथे परवानगी साठी पालिका आयुक्त शशिधर कुरेर यांनी हात झटकले असून अगोदर पोलिसांची एन ओ सी हजर करा मगच मैदानाची परवानगी देऊ अशी आडमुठी भूमिका घेउन हात झटकले आहेत.गेल्या २३ ऑक्टोंबर रोजी मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीने १३ ऑक्टोंबर रोजी महा मेळाव्यास परवानगी साठी टिळकवाडी येथील वक्सीन डेपो मैदान द्यावे असा अर्ज केला होता यावर पालिका आयुक्तांनी अगोदर पोलिसांचा न हरकत पत्र दिल्यावरच मैदानं परवानगी साठी देऊ अस पत्र समितीला दिल आहे.
पोलीस आयुक्त कृष्ण भट्ट यांनी गेल्या दोनच दिवसा पूर्वी झालेल्या पत्रकार परिषदेत लोकशाही मार्गातून निदर्शन करणाऱ्यांना परवानगी देऊ अशी भूमिका घेतली होती मात्र प्रत्यक्षात टोलवा टोलवी सुरु आहे . पोलीस आयुक्तांनी पालिकेने जर मैदानाची परवानगी दिली तर मेळाव्यास परवानगी दिली जाईल अस स्पष्ट केल होत तर दुसरीकडे पालिका आयुक्त पोलीसांची एन ओ सी मागत आहेत. मध्यवर्ती समितीच शिष्टमंडळ शुक्रवारी सायंकाळी पोलीस आयुक्तांची भेट घेऊन परवानगी मागणार आहे.