मैसूरचा वाघ टिपू सुलतान हे अप्रतिम कन्नड प्रेमी ,हिंदू प्रेमी त्यांचा राज्य कारभार सर्व धर्म समभावाचा होता त्यांच्या बद्दल वेगळी माहिती बाहेर काढून इतिहासाच सत्य लपवण्याच्या प्रयत्न केला गेला आहे अस ठाम मत पालकमंत्री रमेश जारकीहोळी यांनी व्यक्त केल आहे.कुमार गंधर्व येथील सभागृहात हजरत टिपू सुलतान जयंतीच्या निमित्ताने टिपू यांच्या प्रतिमेस हार अर्पण केल्या नंतर बोलत होते.सगळ्या जाती धर्मांना नको असणारे धर्मनिरपेक्ष संस्कार केवळ भारतात पाहायला मिळतात पाकिस्तान सौदी अमेरिका असल्या देशात धर्मनिरपेक्ष संस्कार पहायला मिळत नाहीत मात्र सध्या देशात काही जण जातीय धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत अश्यांना तात्पुरता विजय मिळू शकतो मात्र कायम स्वरूपी विजयी होणे शक्य नाही असे म्हणत अप्रत्यक्ष रित्या भाजपला टोला लगावला आहे.
टिपू सुलतान यांनी आपल्या कार्यकाळात अनेक मंदिरांचा जिर्णोधार केला आहे आपल्या राजश्रायात अनेक हिंदुना स्थान दिले होते टिपू बद्दल अनोद्गार काढणाऱ्या बेळगावच्या एका आमदारास आगामी निवडणुकीत जनता त्यांची जागा दाखवून देईल अशी टीका आमदार संजय पाटील यांच्या विरुद्ध केली. टिपू यांनी २०० वर्ष पूर्वी प्रशानासातपंचायत व्यवस्था सुरु केली होती आजही आदर्शवत आहे काही जण टिपूनची बदनामी करत आहेत अस मुफ्ती मंजूर आलम म्हणाले. यावेळी शासकीय पातळीवर शिव जयंती आयोजित करण्यात आली होती .यावेळी आमदार फिरोज सेठ ,जिल्हा पंचायत अध्यक्षा आशा ऐहोळे,एस पी रविकांत गौडा, पालिका आयुक्त शशिधर कुरेर ,जिल्हाधिकारी एस जिया उल्ला जिल्हा पंचायत सी ई ओ रामचंद्र राव आदी उपस्थित होते.