टिपू सुलतान यांची जयंती साजरी करण्यास कर्नाटक भाजप कडून कडाडून विरोध होत असताना टिपू यांच्या संदर्भातील सर्व कागदपत्र ब्रिटीशांच्या लंडन येथील इंडिया ऑफिस मधून भारतात आणण्या साठी माजी मुख्यमंत्री भाजप प्रदेशाध्यक्ष बी एस येडीयुराप्पा यांनी प्रयत्न केले होते.
२६ फेब्रुवारी २०१२ च्या मुंबई टाइमस मध्ये प्रकाशित झालेल्या लेखात हि माहिती समोर आली आहे.टिपू सुलतान आणि हैदर अली हे मैसुरुचे संस्थान जिंकून झालेले राजे होते याच कर्नाटकातील सरकारांनी आज पर्यंत त्यांना मैसूरचा वाघ संबोधून कौतुक केल होत. २०१० च्या काळात टिपू सुलतान आणि राणी कित्तूर चन्नमा यांची सर्व कागदपत्रे लंडन येथील ब्रिटीश लायब्ररी मधून आणण्यासाठी तत्कालीन मुख्यमंत्री बी एस येडीयुराप्पा यांनी पुढाकार घेतला होता या संदर्भात कर्नाटक विधान सभेत चर्चा देखील केली होती तत्कालीन अर्थ आणि मुख्य मंत्री असतेवेळी या कामी २५ लाखांचा बजेट देखील मंजूर केला होता.
सीमा प्रश्नी सुप्रीम कोर्ट दाव्यासाठी प्रयत्न
ब्रिटीश लायब्ररी मधील टिपू सुलतान आणि राणी चन्नमा यांची कागदपत्र मिळवून बेळगाव कर्नाटक महाराष्ट्र सीमा प्रश्नी सुप्रीम कोर्टात हि पत्र सादर करण्याचा उद्देश्य होता या साठी एक समिती लंडन ला जाऊन कागदपत्रांची पाहणी करून आली होती लंडन येथील इंडियन ऑफिस ने पाच लाख डीपोजीट ध्या आणि या पत्रांची micro फिल्म घ्या अस म्हटल्यावर सरकारची अनुमती घेऊन पैसे भरतो अस आश्वासन देऊन हे शिष्टमंडळ परतल होत. राणी चन्नमा यांच्या काळातला मलसर्ज राजाचा मुलगा राजा शिवलिंग रुद्र सर्जा यांनी मराठी भाषेतून व्यवहार केला होता आणि टिपू सुलतान ची देखील अनेक मराठी पत्र उपलब्ध आहेत ही पत्र मराठीत असल्याने येडीयुराप्पांचे हे प्रयत्न देखील अंगलट आल्याने पुन्हा पत्र आणणायचे प्रयत्नच झाले नाहीत.