कर्नाटक राज्याला स्वतंत्र असा लाल पिवळ्या ध्वजाला अधिकृत कायदेशीर मान्यता मिळावी या विषया बद्दल १३ पासून बेळगावात सुरु होणाऱ्या हिवाळी अधिवेशनात चर्चा होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
या साठी राज्य सरकारने नेमलेल्या तज्ञ समितीची बैठक गुरुवारी सायंकाळी विकास सौध बंगळूरू येथे घेण्यात आली. ध्वज समितीची रचना केल्या नंतर तब्बल पाच महिन्यांनी या समितीची बैठक घेण्यात आली आहे. लाल पिवळ्या ध्वजास कर्नाटक राज्याचा अधिकृत ध्वज अशी मान्यता मिळावी या साठी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी ६ जून रोजी समितीच गठन करून अहवाल मागितला होता त्यानंतर तब्बल पाच महिन्यांनी या समितीची पहिली बैठक झाली आहे.
ध्वज आणि कायदा या संदर्भात चर्चा करून ही समिती मुख्यमंत्र्यांना अहवाल देणार आहे त्यानंतर मुख्यमंत्री हा प्रस्ताव दिल्लीला पाठवायचा की नाही याबद्दल निर्णय घेणार आहेत.कन्नड आणि संस्कृती खात्याचे मुख्य सचिव चक्रवर्ती मोहन अध्यक्षतेखाली या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते या बैठकीत कन्नड प्राधीकारचे अध्यक्ष एस जी सिद्धरामय्या हे देखील हजार होते .लाल पिवळ्या ध्वजास अधिकृत मान्यता देण्यात यावी याबद्दल महत्वपूर्ण अशी चर्चा बैठकीत करण्यात आली आहे कन्नड साहित्य परिषदेच्या सदस्यांनी देखील या बैठकीत महत्वाचे मुद्दे मांडले आहेत.
बेळगावात होणाऱ्या हिवाळी अधिवेशनात या अधिकृत ध्वजा बद्दल चर्चा करण्यात येणार आहे अशी माहिती उपलब्ध झाली आहे अगोदरच राज्याच्या स्वतंत्र ध्वजास भाजपने विरोध केला असल्याने बेळगावातील अधिवेशनात ध्वजा वरून चर्चा रंगणार आहे.