एक नोव्हेंबर काळ्या दिनात सहभागी झाल्या नंतर पहिले दोन दिवस महापौर संज्योत बांदेकर यांच्या निवासस्थानी बंदोबस्त ठेवल्या नंतर पोलिसांनी महापौरांना कायमस्वरूपी सुरक्षा रक्षक तैनात केला आहे.
मागील काही वर्षात काळ्या दिनात सहभागी झाल्यावर अनेकदा कन्नड वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी पालिका कक्षावर भ्याड हल्ले केले होते त्याच पाश्वभूमीवर पोलिसांनी महापौरांना दोन बंदूकधारी सुरक्षा रक्षक आळी पाळीने तैनात त्यांना सुरक्षेसाठी देण्यात आले आहेत.ज्या कार्यक्रमात महापौर जात आहेत या कार्यक्रमात हे बंदूकधारी सुरक्षा रक्षक त्यांच्या सोबत फिरत आहेत.
13 नोव्हेंबर पासून बेळगावात होणाऱ्या हिवाळी अधिवेशना विरोधात होणाऱ्या महा मेळाव्याच्या पाश्व भूमीवर महापौरांची सुरक्षा वाढवण्यात आली आहे.