उद्या(शुक्रवारी) होणाऱ्या टिपू सुलतान जयंतीच्या निमित्ताने बेळगाव शहर आणि संपूर्ण तालुक्यात 144कलम जमावबंदीचा आदेश देण्यात आला आहे.बेळगावातील कायदा आणि सुव्यवस्था सांभाळण्या साठी कोणतेही सरकारी मालमत्तेच नुकसान रोखण्यासाठी पोलीस आयुक्त कृष्ण भट्ट यांनी हा आदेश एका प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात जाहीर केला आहे.
टिपू जयंतीच्या विरोधात भाजप किंवा अन्य हिंदुत्व वादी संघटना कडून आंदोलन होऊन सार्वजनिक मालमत्तेच नुकसान होऊ शकतं हे रोखण्यासाठी शुक्रवारी सकाळी 6 ते शनिवारी सकाळी 6 पर्यंत ipc 144 कलमा अंतर्गत जमावबंदी चा आदेश दिला आहे असं देखील पोलीस आयुक्तांनी पत्रकात म्हटलं आहे. शहरा सह जिल्ह्यात देखील हा आदेश लागू करण्यात आला आहे