Tuesday, January 7, 2025

/

तालुक्यात वारे सरस्वती पाटिलांचे

 belgaum

तालुका समितीच्या पुढाऱ्यांच्या दुहीच्या प्रवृत्तीने बेळगाव ग्रामीण मतदार संघात सलग दोन वेळा सीमावासीयांना मान कापून घ्यावी लागली. कोण काँग्रेस तर कोण भाजपचे धोरण सांगत यावेळीही आपला दावा मागत असतांना सध्या धडाकेबाज जिल्हा पंचायत सदस्य म्हणून नावलौकिक मिळवलेल्या सरस्वती पाटील यांचे वारे वाहू लागले आहे. या वाऱ्याचे ‘वादळ’ केल्यास समितीचा ग्रामीण मधील विजय नक्की ठरणार आहे.
सरस्वती पाटील या समितिनिष्ठ आहेत. उचगाव मतदार संघातून त्या जिल्हा पंचायतीवर निवडून गेल्या आणि कन्नडीगांचे लाडके जिल्हाधिकारी एन जयराम यांना त्यांनी त्वेषाने टक्कर दिली, सरस्वती पाटील दिसल्या की जयराम चरफडत असायचे, मराठीतूनच बोलणार. कागदपत्रे मराठीच द्या, असा सतत नारा लावून सरस्वती पाटील यांनी मराठी आवाज बळकट केला आहे.
सध्या त्यांचे वारे वाहत असताना काहींना मोठा धक्का बसला आहे, कुणाचीच भीड न बाळगता पुढे चाललेल्या सरस्वती ताई या तालुक्यातील जनतेच्या आवाज ठरत असून येत्या विधानसभेत त्यांचा हा आवाज अधिक बळकट करण्याचे प्रयत्न करावे लागणार आहेत.

सध्या तालुका समितीत ज्यांच्याकडे एका गटाच नेतृत्व आहे त्याच गटाच्या जिल्हा पंचायत सदस्या म्हणून त्यांनी प्रामाणिक काम केलं आहे आपल्या कार्यातून वेगळा ठसा निर्माण केला आहे अश्या वेळी दोनदा अपयश मिळालेल्या तालुका समिती नेतृत्वाने किंग मेकरची भूमिका घेतल्यास त्यांचं नेतृत्व पुन्हा उजळून निघेल समितीला यश मिळेल त्यांचा मोठेपणा त्याग समोर येईल यात तीळ मात्र शंका नाही.SArasvati patilयेत्या निवडणुकीत काँग्रेस तर्फे महिला उमेदवार येणार हे नक्की आहे. भाजप चे कोण याचे गणित वेगळ्या पद्धतीने सुरू आहे. समिती मधील भांडणे कायम ठेवतो आणि तुम्हाला निवडून देतो व्यवहार करा असे घाणेरडे राजकारण काहीजण करत आहेत. राष्ट्रीय पक्षही हे भांडण कायम ठेवण्यासाठी पैसे पेरत आहेत, अशा स्थितीत मराठी बाणा कायम ठेवण्यासाठी सरस्वती पाटील यांच्या समर्थनाची लाट महत्वाची ठरेल असे वाटते.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.