नोट बंदी ला एक वर्ष पूर्ण झाल्याने कॉंग्रेसने काळा दिन बेळगावात निदर्शन केली.
काँग्रेस कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालया समोर निदर्शन करत निवेदन सादर केलं.
नोट बंदीने देशात अराजकता वाढली आहे आर्थिक बेशिस्त वाढली आहे देशा समोर भयावह स्थिती निर्माण झाली असल्याची टीका बेळगाव काँग्रेस नेत्यांनी केली आहे.यावेळी शेकडो काँग्रेस कार्यकर्ते आंदोलनात सहभागी झाले होते.
नोटबंदी म्हणजे संघटित लूटच असं विधान काल माजी पंतप्रधान मनमोहनसिंह यांनी केलं आहे. यावेळी नोटबंदीचा निर्णय पूर्ण फसला असून घातक ठरला तरीही भाजप काळा पैसा विरोधी दिन साजरा करतंय याचा निषेध करत टीका करण्यात आली.नोटाबंदी ही एक शोकांतिका आहे असंही राहुल गांधी यांनी ट्विट केलंय.