मागील वर्षीच्या काळ्या दिनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो घेऊन आणि तोंडावर काळी पट्टी बांधून सहभागी झालेल्या त्यावेळच्या महापौर सरिता पाटील तुम्हाला आठवत असतील, महा पालिका बरखास्त होईल ही भीती न धरता त्यांनी दाखवलेलं धाडस मोठं आहे, त्यांनी घालून दिलेले उदाहरण यंदा महापौर संज्योत बांदेकर यांनी पुढे चालवले, म्हणजेच सरिता पाटील एका धाडसी परंपरेच्या जनक ठरल्या आहेत.
म ए समिती महिला आघाडीच्या अध्यक्षा कै लताताई पाटील यांची कणखर सून म्हणून त्या सार्थ ठरल्या आहेत.आपल्या सासूबाईंच्या निधनानंतर पोट निवडणुकीत त्या निवडून आल्या, त्यानंतर दुसऱ्या टर्म मध्ये निवडून येऊन त्या महापौर झाल्या आणि त्यांनी पदासाठी माघार घेणार नाही हेच दाखवून दिले.
आपण ज्या लोकांनी निवडून दिले त्यांच्या भावनांशी प्रामाणिक राहिले पाहिजे, हे तत्व सरिता पाटील यांनी एक महिला असूनही घालून दिले आहे. त्यांच्या पूर्वी महापौर झालेले किरण सायनाक असोत किंवा महेश नाईक हे पळपुटे ठरले होते, महापौर असताना काळ्या दिनी ते गायब व्हायचे यामुळे जनतेच्या संतापाचा सामना त्यांना करावा लागला, सरिता पाटील या पुरुष महापौरांपेक्षा धाडसी ठरल्या.
अंतर्गत माहिती नुसार यंदाच्या महापौर ही काहीशी कचखाऊ भूमिका घेत होत्या मात्र सरिता पाटील यांनी त्यांना धीर देऊन तयार केले, त्यांच्या सोबत त्या स्वतः थांबल्या आणि मराठी भाषिकांचा आवाज बळकट केला.
सिमावासीय या धाडसाची नक्कीच दखल घेत आहेत. महिला म्हणून दबून राहण्यापेक्षा आपला कणखर बाणा दाखवून देणाऱ्या सरिता पाटील अशा शब्दात त्यांचा उल्लेख होत आहे, यापुढे कोणी पुरुष महापौर झालाच तर त्याने यांचा आदर्श घ्यावा लागेल, नाहीतर महापौर असताना पळ काढून पद गेल्यावर काळ्या दिनाला येण्यात काय मतलब?
Trending Now