कर्नाटकी अधिवेशना विरोधात महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने 13नोव्हेंम्बर रोजी होणाऱ्या मेळाव्यास शेवटच्या क्षणी परवानगी न देता लवकर रीतसर परवानगी ध्या अशी मागणी मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीने केली आहे.
मंगळवारी सायंकाळी समितीच्या शिष्टमंडळांने पोलीस आयुक्त टी जी कृष्ण भट्ट यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली.यावेळी मध्यवर्ती एकीकरण समिती अध्यक्ष दीपक दळवी मालोजी अष्टेकर मनोहर किणेकर प्रकाश मरगाळे विकास कलघटगी महेश जुवेकर दता उघाडे आदी उपस्थित होते.
मेळाव्यास शासनाने विना विलंब अनुमती ध्यावी सोशल मीडियावर कार्यरत मराठी युवकावर विना कारन गुन्हे घालू नये अशी देखील मागणी करण्यात आली आहे.
कर्नाटकाकडून लोकशाहीच्या हक्कावर गदा आणण्याचे प्रयत्न म्हणून वारंवार बेळगावात विधिमंडळ अधिवेशन घेतलं जातं आहे पण सीमा भागातील मराठी माणूस नक्कीच पुन्हा एकदा आपला महाराष्ट्रात जाण्याचा आवाज दाखवेल अस मत दीपक दळवी यांनी यावेळी व्यक्त केलं आहे