कर्नाटक सरकारच्या वतीने 10 नोव्हेंम्बर रोजी सरकारी पातळीवर आयोजित केलेल्या टिपू जयंती विरोधात विश्व हिंदू परिषद बजरंग दलाच्या वतीने निषेध मोर्चा काढण्यात आला.मंगळवारी सकाळी चनम्मा चौकातून जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून राज्य सरकार विरोधी घोषणा देण्यात आल्या.
टिपू सुलतान च्या काळात कन्नड ऐवजी उर्दू आणि पर्शियन भाषेचा पुरस्कार केला होता त्यामुळं टिपू कर्नाटक विरोधी होते राज्य कारभाराची कन्नड भाषा असताना उर्दू आणि पर्शियन भाषा कन्नड वर लादली होती असा आरोप देखील जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात करण्यात आला आहे.
राज्य सरकारने टिपूचा उल्लेख स्वातंत्र्य वीर असा करण्यात आलाय हे देखील चुकीचं आहे असं निवेदनात नमूद करण्यात आलंय.यावेळी बजरंग दलाचे युवक कार्यकर्ते उपस्थित होते