घरात एकटीच राहणाऱ्या वृद्ध महिलेला गळा दाबून खून करून चोरी केल्याची घटना मंगळवारी सकाळी आझाद नगर येथे उघडकीस आली आहे.
शैलाज हिदायतुला मोकाशी वय 55 रा.सहावा क्रॉस आझाद नगर बेळगाव अस मयत वृद्ध महिलेचं नाव आहे.घटनास्थळी माळ मारुती पोलिसांनी भेट दिली असून श्वान पथक आणि फिंगर प्रिंट एक्सपर्ट देखील दाखल झाले आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शैलाज या आझाद नगर सहाव्या क्रॉस मध्ये एकट्याच रहात होत्या त्यांचा एक मुलगा दुबई मध्ये नोकरी करतो तर एक मुलगा वीरभद्रनगर मध्ये वेगळे राहत होता.सोमवारी रात्री उशिरा नातलगाच्या घरी कार्यक्रम आटोपून आपल्या घरी आल्या होत्या.सकाळी शेजारील लोकांनी नळाला पाणी आलं आहे असं सांगायला गेले असता दरवाजा उघडा होता आणि त्या मृतावस्थेत पडल्या होत्या.
त्यांच्या घरातील कपाट उघड असून सर्व दागिने रोख रक्कम चोरट्यानी लंपास केलो आहे.गळा दाबून त्यांचा खून करण्यात आला आहे अशी देखील माहिती मिळाली आहे.किती रक्कम दागिने लंपास केलेत याचा तपास पोलीस करताहेत आझाद नगर सारख्या दाट लोक वस्तीत खून करून चोरी झाल्याने स्थानिकात आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे