Wednesday, January 8, 2025

/

बापट गल्लीतील बहुमजली पार्किंग बारगळले

 belgaum

बेळगाव महापालिकेचा महत्वाचा मानला जाणार बापट गल्ली येथील हैड्रोलिक बहुमजली पार्किंगचा प्रस्ताव बारगळला आहे. मुंबई येथील ज्या बेल फ्लूड नावाच्या कंपनीला टेंडर देण्यात आला होता त्या कम्पनीने जी एस टी लागू झाल्याने 4.7कोटी रक्कमेत आपण हा प्रोजेक्त पूर्ण करू शकत नाही असं पत्र महापालिकेस लिहिलं आहे.Car parking4 कोटी 70 लाखात हैड्रोलिक सिस्टम वरचे बहुमजली पार्किंग करण्याचं काम मुंबई स्थित कम्पनीला देण्यात आलं होतं.2007 पासून बापट गल्लीत हे पार्किंग बनवण्याचा प्रस्ताव प्रलंबित आहे.

बेल फ्लूड कम्पनीने काम करण्यास असमर्थता दर्शवल्याने पुन्हा एकदा निविदा काढण्यात येणार आहे त्यामुळं पुन्हा एकदा श्री गणेशा करावी लागणार आहे सर्व व्यवस्थित गेल्यास काम सुरू होण्यास आणखी सहा महिन्यांचा अवधी लागणार आहे.

मागील निविदेत एकाच कम्पनीने टेंडर भरला होता वर्क ऑर्डर देण्यास विलंब झाल्याने काम सुरू होण्यास इतका उशीर झाला होता त्यातच जी एस टी लागू झाल्याने कंपनीने काम करण्यास असमर्थता दर्शवली आहे

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.