भ्रष्टाचार निर्मुलन परिवारचे अध्यक्ष सुजित मुळगुंद यांच्या नेतृत्वात आगामी विधान सभा निवडणुकीत ‘मत भ्रष्टाचाऱ्यास नको’ या आगळी वेगळी मोहिमेस चांगला प्रतिसाद मिळत आहे.माझं “मत भ्रष्टाचाऱ्यास नको” अश्या आशयाचे स्टीकर प्रत्येक घरावर चिकटवण्यात येत आहे गेले दोन आठवडे हि मोहीम दक्षिण मतदार संघात राबविल्या नंतर उत्तर मतदार संघात देखील या मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला.
शहरातील सुशिक्षित अश्या समजल्या जाणाऱ्या महांतेश नगर भागात हि मोहीम राबवण्यात आली या अंतर्गत जनतेकडून उतम प्रतिसाद मिळत असून लोक स्वत होऊन स्टीकर आपल्या घरावर चिकटून घेत आहेट अशी महिती सुजित यांनी बेळगाव live कडे दिली आहे.आगामी काही दिवसात या मोहिमे अंतर्गत बेळगावातील झालेला भ्रष्टाचार आपण उखडून काढणार असून सर्वच राष्ट्रीय पक्षातील भ्रष्ट लोक प्रतिनिधी विरोधात मोहीम उघडणार असयाचे देखील त्यांनी स्पष्ट केले आहे.
महंतेशनगर भागात वकील एस आर लातूर, विजयकुमार पाटील आदी महिला कार्यकर्त्यांनी देखील या मोहिमेत सहभाग घेतला होता.