निवडणूक जवळ आली की दंगली होऊ लागतात, लोकांचे लक्ष भलतीकडे वळवून अनेकजण आपला स्वार्थ साधण्याचा प्रयत्न करतात. सध्या तसे प्रयत्न सुरू झाले आहेत. या प्रकाराला शांत आणि संयमाने तोंड देऊन असफल करावे लागेल.
काही लोकप्रतिनिधींच्या पायाखालची वाळू सध्या घसरत चालली आहे.जनतेच्या मनातून घसरत असल्यामुळे जातीय दंगल घडविण्याचा प्रयत्न सुरू आहे. शनिवारी रात्री असाच प्रयत्न झाला, पण तो असफल ठरला.
१ नोव्हेंबर रोजी कोर्ट कंपाऊंड जवळील अंजुमन दर्गा येथे राज्योत्सवच्या मिरवणुकीत साउंड बंद करण्याच्या निमित्ताने राजकीय कार्यकर्ते मटका घेणाऱ्याच्या पिल्यावळ्यानी प्रचंड प्रमाणात दगडफेक करून जातीय दंगल करण्याचा प्रयत्न केला होता ,तेथील आजूबाजूला संवेदनशील भागातील जागृत नागरिकांनी यांचा प्रयत्न हाणून पाडला .
दुसरा प्रयत्न शनिवारी रात्री ११ वाजता संवेदनशील भागात दगड आणि बाटल्या फेकून शहरात शांतता भंग करण्याचा प्रयत्न होता. येत्या निवडणूकित आपल्या समाज्यातून आपल्याला विरोध होत आहे.आणि नेमकी वरिष्ठ पोलिस अधिकारीची बदली झाली आहे याचा नेमका आपल्याला फायदा होईल असा तरी काही राजकीय डावपेच असेल का ?असा प्रश्न सर्व सामान्य जनतेतून दबक्या आवाजात ऐकायला मिळत आहे.
नेमकं बेळगावकराना हे राजकीय पुढारी जातीय वादात बांधून आपल्या स्वार्थसाठी जनतेला वेठीस धरत आहेत .बेळगाव live च्या माध्यमातून आम्ही बेळगावकराना, आपलं बेळगाव शांत बेळगाव ठेवा असे आवाहन करीत आहे.
Trending Now