कॅपिटल वन संस्थेच्या वतीनं अखिल भारतीय स्तरावर भव्य एकांकिका स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे. ही स्पर्धा सर्वांसाठी खुली असून यासाठी 11 हजार 7 हजार आणि 5 हजार रु अशी बक्षिसे देण्यात येणार आहेत
नवनविन लेखक कलाकार दिग्दर्शक निर्माण व्हावेत या उदात्त हेतूने शहराच्या नाट्य परंपरेला उर्जित अवस्था देण्याचे काम कॅपिटल वन संस्था करत आली आहे. मागील वर्षीच्या एकांकिका स्पर्धेत समकालिन प्रश्न समाज वास्तवता यांचा तुटवडा भासत होता अधिकपणे सादरीकरण होत असले तरी अनेक विषयांची पुनरावृत्ती होत असल्याचे जाणवत होते म्हणूनच नवनवीन विषय त्यांची मांडणी यावी यासाठी सलग दुसऱ्या वर्षी अखिल भारतीय मराठी एकांकिका लेखन स्पर्धेचे आयोजन केलं आहे अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष शिवाजी हंडे यांनी दिली आहे सालाबादप्रमाणे जानेवारी महिन्यात एकांकिका स्पर्धेचे आयोजन करणार असल्याचे ते म्हणाले.
अधिक माहिती साठी 0831- 24344444-45 या दूरध्वनी क्रमांक तथा capitalone.in@gmail. com ला मेल करून नियम अटी मिळवता येतील. प्रवेश अर्ज 5-11-2017 ते 5-12-2017 या कालावधीत स्विकारता येतील .