सध्या टिपू सुलतान जयंतीच्या मुद्द्यावरून जोरात राजकारण आहे असं असताना टिपू जयंतीला विरोध करणाऱ्या केंद्रीय कौशल राज्य विकास मंत्री अनंतकुमार हेंगडे यांना 10 नोव्हेंम्बर रोजी होणाऱ्या टिपू जयंतीच्या कार्यक्रमात विशेष अतिथी म्हणून स्थान देण्यात आले आहे.
बेळगाव जिल्हा प्रशासनाने टिपू सुलतान जयंती साठी छापलेल्या आमंत्रण पत्रिकेत हेगडे यांनाच प्रमुख अतिथी म्हणून स्थान देण्यात आले आहे.
टिपू सुलतान यांच्या जयंतीला विरोध करत माझं नाव आमंत्रण पत्रिकेत घालू नये अशी मागणी केंद्रीय मंत्री हेगडे आणि खासदार सुरेश अंगडी यांनी जिल्हा प्रशासनाकडे केली होती मात्र 10 नोव्हेंम्बर रोजी सकाळी 11 वाजता बेळगावातील कुमार गंधर्व रंग मंदिरात होणाऱ्या कार्यक्रमाच्या आमंत्रण पत्रिकेत दोन्ही नेत्यांची नाव छापली आहेत.
एकूणच टिपूच्या मुद्द्यावरून आगामी विधान सभा निवडणुकीच्या अगोदर भाजप आणि काँग्रेस कडून वोट बँकेचे राजकारण सुरू झाले आहे.