सिंघम चित्रपटात प्रामाणिक आणि कर्तव्यदक्ष बाजीराव सिंघम ला खलभूमिकेतील जयकांत शिकरे च्या त्रासाचा सामना करावा लागला. सध्या वास्तवातील बेळगावच्या शहापूर पोलीस स्थानकातील सिंघम सीपीआय जावेद मुशापुरी यांनाही अशाच खलनायकाचा त्रास सुरू आहे, त्या जयकांत शिकरे चा शोध घेऊन प्रशासनाने धडा शिकवण्याची गरज आहे.
सीपीआय मुशापुरी हे सध्या नाव लौकिक प्राप्त करत आहेत. जनताभिमुख पोलिसिंग साठी ते प्रसिद्ध आहेत, अशावेळी त्यांच्या प्रसिद्धीचा व लोकप्रियतेचा पोटशूळ उठलेला एक लोकप्रतिनिधी त्यांना त्रास करू लागल्याची आणि धमकी देत असल्याची माहिती पुढे येत आहे. अशा खलनायकाचा वेळीच बंदोबस्त करावा लागणार आहे .पोलिसांना त्रास देणाऱ्या आजी माजी लोकप्रतिनिधींची तुलना या जयकांत शी या निमिताने केली जात आहे.
सीपीआय मुशापुरी यांनी सहन न करता त्या जयकांत शिकरेवर कारवाई करावी, जनता त्यांना साथ देईल आणि वरिष्ठ पोलीस अधिकारीही देतील यात शंका नाही.
Trending Now
Singham of Belgaum is only Javed musafir.. disciplined and janpriya police officer