बेळगावात सुतक दिन म्हणून पाळला जाणारा काळा दिन शांततेत यशस्वी झाला, मरगळ हटली आणि सीमाप्रश्नाला पुन्हा एकदा झंझावाती स्वरूप आले आहे. याचे श्रेय बेळगाव live ला आहे अशी भावना जनतेतून व्यक्त झाली आहे.
अनेकांनी याबद्दल काही लिहा अशी विनंती केली, बेळगाव live ने सर्वप्रथम मिरवणुकीतील वाहन संख्या कमी करण्यावर भर दिला होता, यासाठी “ना गाडी ना घोडा, फक्त मूक सायकल फेरी” ही संकल्पना राबवली. यामुळे चांगला प्रतिसाद लाभला आहे. यंदा गाड्यांची संख्या काही प्रमाणात कमी करण्यात यश आले आहे.
चालू शकत नसलेल्या महिला आणि वृद्धांना वाहने घेऊन सहभागी होणे गरजेचे होते यामुळे ही त्यांना सवलत द्यावी लागली, तरीही जास्तीत जास्त युवक पायी चालत फेरीत सहभागी झाले हे मोठे यश आहे.
कोणताही अनुचित प्रकार होऊ नये म्हणून वारंवार जागृती आणि समिती नेते व कार्यकर्त्यांच्या मुलाखती बेळगाव live ने प्रसिद्ध केल्या, यामुळे शिस्तबद्ध फेरीचा अनुभव घेता आला आहे.
अनेकांनी फोन करून बेळगाव live च्या या प्रयत्नांचे कौतुक केले आहे.
या उपक्रमात साथ दिलेले समिती नेते , कार्यकर्ते, पोलीस प्रशासन आणि पत्रकार बांधवांचे आभारी आहोत.